User:Mahitgar/sandbox 2

Preview of the original artwork (in English)
  • विकिमीडिया कॉमन्समध्ये आपण कायकाय टाकू शकता?
  • केवळ तुमची स्वतःचीच निर्मिती असलेले काम तुम्ही चढवू (अपलोडू) शकता.
  • अशा साहित्यांत खालील प्रकारच्या छायाचित्रांचा आणि चित्रफितींचा अंंतर्भाव करता येईल :
    • निसर्गचित्रे, प्राण्यांची किंवा वनस्पतींची नैसर्गिक छायाचित्रे
    • लोकांची किंवा खास व्यक्तींची सार्वजनिक ठिकाणी काढलेली छायाचित्रे
    • कलात्मक नसलेल्या पण उपयोगी वस्तूंची चित्रे
    • अस्सल आलेख, नकाशे, आकृत्या ध्वनिमुदिते साहित्य
    • हे ध्यानात असू द्यावे: मात्र आपले असे साहित्य आपणास पूर्वसूचित न करताही नकलवण्याची, बदलण्याची तसेच विक्रीचीही सर्वांना मुभा असेल.

लक्षात घ्या, तुमचे स्वतःचे नसलेले किंवा दुसर्‍या कुणाच्या तरी कामाची भ्रष्ट नक्कल असलेले साहित्य आम्ही स्वीकारत नाही. अशा साहित्यामध्ये

  • बोधचिन्हे
  • सीडी/डीव्हीडी यांच्या मुखपृष्ठावरील छापील साहित्य
  • प्रसिद्धी मिळवण्यासाठी काढलेली छायाचित्रे
  • दूरचित्रवाणी, चित्रपट, आदींच्या कार्यक्रमांचे स्क्रीनशॉट किंवा त्यांचे सॉफ्टवेअर
    • दूरचित्रवाणीवर वा चित्रपटांत दिसणार्‍या पात्रांची किंवा कॉमिक्समधील पात्रांची चित्रे, अगदी तुम्ही स्वत: काढली असली तरी.
    • आंतरजालावरून उतरवलेली बहुतांशी चित्रे, यांचा समावेश असेल.

मात्र,

  • जर मूळ कलावंतानेे त्याची कृती नकलवण्याची, त्यात फेरबदल करण्याची अथवा त्या साहित्याची विक्रीची खुली लिखित अनुमती दिली असल्यास असे साहित्य तुम्ही विकिमीडिया कॉमन्सवर चढवू शकता. आणि,
  • साधारणपणे दीडशे वर्षांहूनही जुन्या कलाकृती, पुतळे, आणि वास्तू यांची तुम्ही स्वतः काढलेली चित्रे किंवा छायाचित्रेही तुम्ही विकिमीडिया कॉमन्सवर चढवू शकता.

थोडक्यात काय तर तुमची स्वतःचीच निर्मिती असलेल्या कृती किंवा
त्या साहित्यावर ज्याचा हक्क आहे अशा संबंधित व्यक्तीची सुस्पष्ट लिखित परवानगी असलेल्या कृतीच आही स्वीकारतो.

अजूनही साशंक असल्यास मदतकेंद्रावर आपली शंका जरूर विचारावी.

  • ठिक
  • थांबा
  • ठिक
  • थांबा