वैश्विक आचार संहिता अंमलबजावणी मसूदा मार्गदर्शक तत्वां

This page is a translated version of the page Universal Code of Conduct/Enforcement draft guidelines review and the translation is 77% complete.
Universal Code of Conduct

Enforcement draft guidelines abstract

In this table, you can find an abstract of the full Enforcement draft guidelines review document. It was created to ensure that every member of the community can understand the new guidelines.

WHO will be responsible for enforcing the UCOC?

 • The WMF, designated people such as code enforcement officers, and a new committee called the Universal Code of Conduct Coordinating Committee (AKA the U4C).
 • The U4C will oversee the process of UCoC enforcement, manage special cases, provide guidance and training, and monitor enforcement of the UCoC.
 • Local and global functionaries[1] will have guidance to know how to enforce the UCoC even if they are not part of the U4C.

HOW will this be done?

 • Local communities, affiliates, and the WMF should develop and conduct training for community members so they can better address harassment and other UCoC violations.
 • The guidelines also lay out recommendations for which parties should address what types of UCoC violations.

WHAT else needs to be done to enforce the UCOC?

 • The draft notes that appeals should be possible and practically available to individuals who were sanctioned for UCoC violations.

HOW can I get involved in the EDGR process?

Introduction

वैश्विक आचार संहिता टप्पा 2 मसूदा समिती लाअंमलबजावणी मसूदा मार्गदर्शक तत्वां बाबत वैश्विक आचार संहिता (Universal Code of Conduct, UCoC) साठी टिप्पण्या हव्या आहेत. हा पुनरावलोकन कालावधी १७ ऑगस्ट २०२१ ते १७ ऑक्टोबर २०२१ मध्ये नियोजित आहे. मसूदा आढावा चर्चा पृष्ठावर कोणत्याही भाषेमध्ये,अनुवादांची चर्चा पृष्ठे,स्थानिक चर्चा,गोलमेज चर्चा,संभाषण तास, पोहोचण्याचे इतर प्रकार आणि ईमेलने ucocproject@wikimedia.org येथे टिप्पण्या आमंत्रित केल्या जात आहेत.

Wikimedia समुदायांची मतेसंपूर्ण UCoC प्रकल्पात गोळा केली गेली आहेत. संकलित साहित्याचे ११ स्वयंसेवक आणि ४ Wikimedia फाउंडेशन कर्मचारी सदस्यांच्यामसूदा समितीने पुनरावलोकन केले आहे. सर्वसमावेशक समुदाय पुनरावलोकनासाठी अंमलबजावणी मसूदा मार्गदर्शक तत्वे तयार करण्यासाठी तेअनेक महिने भेटत राहिले. जमा केलेली मते मार्गदर्शक तत्वांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी वापरली जातील.

तुम्ही तुमच्या पसंतीची भाषा आणि सहभागाचा मार्ग निवडू शकता. अनेक Wikimedia प्रकल्पांमध्ये विविध भाषांमध्ये संभाषणे आयोजित केली जातील. प्रकल्पांवर चर्चा आयोजित करण्यासाठी स्वयंसेवक आवश्यक आहेत. सुविधा देणारे अनेक चॅनेल्स पाहात आहेत आणि प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि चर्चा आयोजित करण्यास मदत करण्यासाठी उपलब्ध आहेत.

चर्चेचा सारांश काढून दर दोन आठवड्यांनी मसूदा समितीकडे सादर केला जाईल. सारांशयेथे प्रकाशित केले जातील.

Enforcement draft guidelines

मसूदा समितीकडून टीप

कृपया लक्षात ठेवा की या दस्तऐवजामध्ये दिलेली UCoC अंमलबजावणी मार्गदर्शक तत्वे पुनरावृत्ती करणारी आहेत आणि समुदायाचा अभिप्रायांनुसार, वैश्विक आचार संहितेसह त्यांचे निरंतर मूल्यांकन केले जाईल आणि ती विकसित होत राहतील. या मसुद्याच्या संदर्भात विचार करण्यासाठी समितीने समुदायाला प्रश्न प्रदान केलेले आहेत.

विहंगावलोकन

संहिता अंमलबजावणी व्याख्या

संहिता अंमलबजावणी म्हणजे वैश्विक आचार संहितेच्या उल्लंघनांना प्रतिबंध करणे, ते ओळखणे, त्याचा तपास करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे. संहितेची अंमलबजावणी करणे ही नियुक्त केलेल्या कार्यकर्त्यांची, वैश्विक आचार संहिता [“U4C समिती” - अंतिम नाव निर्धारित करणे] आणि Wikimedia फाउंडेशनची जबाबदारी आहे. हे योग्य, समयोजित पद्धतीने संपूर्ण Wikimedia चळवळीमध्ये सातत्याने केले गेले पाहिजे. परिणामी, वैश्विक आचार संहितेची अंमलबजावणी करण्याचे अधिकार असलेल्या लोकांना ते अंमलबजावणी करत असलेल्या नियमनांची बारकाईने माहिती असली पाहिजे.

UCoC ची अंमलबजावणी प्रतिबंधात्मक कार्ये आणि मोहिमांद्वारे, समस्यात्मक वर्तनाची लक्षणे असलेल्या लोकांना अनुपालनाबाबत चेतावण्या आणि सूचना जारी करून, त्यांच्यावर तांत्रिक निर्बंध लादून आणि शिक्षा करून किंवा आवश्यक व योग्य ती पावले उचलून लागू केली जाते. Wikimedia स्पेसेसवर, ऑनलाईन आणि ऑफलाईन, दोन्ही प्रकारे धोरणे, संहिता, नियम व नियमनांची अंमलबजावणी करणाऱ्या स्थानिक व जागतिक कार्यकर्त्यांनी संहिता अंमलबजावणी कार्य व प्रक्रियेचे व्यवस्थापन समजावून घेतले पाहिजे.

संहिता अंमलबजावणी अधिकारी (निर्धारित करणे) व्याख्या:

[संहिता अंमलबजावणी अधिकारी - अंतिम नाव निर्धारित करणे] हा Wikimedia चळवळीचा एक स्वयंसेवक किंवा कर्मचारी सदस्य असतो, ज्याच्याकडे प्रशिक्षण आणि तांत्रिक अधिकार असतात आणि वैश्विक आचार संहितेच्या उल्लंघनांस प्रतिबंध करणे, ते शोधणे, त्याचा तपास करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे ही त्याची कर्तव्ये असतात.

संहिता अंमलबजावणी समिती - “U4C समिती” व्याख्या:

मसूदा समिती, Wikimedia समुदाय आणि Wikimedia फाउंडेशनसह UCoC च्या अंमलबजावणीमध्ये भागीदार होण्याबरोबरच, UCoC अंमलबजावणीवर देखरेख करण्यासाठी एक कायमस्वरूपी समिती स्थापन करण्याची शिफारस करते.

“U4C समिती” UCoC च्या उल्लंघन अहवालांवर देखरेख करते, अतिरिक्त तपासात सहभागी होऊ शकते आणि योग्य तिथे प्रतिसादकर्त्याला काय कृती करावी त्याची शिफारस करते.

जेव्हा एखाद्या प्रकरणात, Wikimedia फाउंडेशन किंवा वापरकर्त्याविरुद्ध कायदा अंमलबजावणीकडून किंवा संभाव्य कायदेशीर कारवाईकडून माहितीची विनंती समाविष्ट असते, तेव्हा संबंधित समुदाय स्वयंसेवक किंवा कायदेशीर पक्षांना संबंधित UCoC कलमाबाबत मदत करण्यासाठी “U4C समिती” Wikimedia फाउंडेशनकडून मदत आणि शैक्षणिक साहित्याची विनंती करू शकते.

आवश्यक असेल तेव्हा, “U4C समिती” प्रकरणे हाताळण्यासाठी Wikimedia फाउंडेशनला मदत करेल. याशिवाय, “U4C समिती” संहितेच्या अंमलबजावणीवर नियमितपणे देखरेख व मूल्यांकन करेल आणि Wikimedia फाउंडेशन आणि समुदायाला विचार करण्यासाठी UCoC मध्ये योग्य ते बदल सुचवू शकेल.

एकदा स्थापन झाल्यावर, कायमस्वरूपी समिती ठरवेल की किती वारंवार बैठक बोलवावी आणि त्यांच्याकडे कोणत्या प्रकारची प्रकरणे पाठवली जावी. आम्ही शिफारस करतो की या समितीने खालील प्रकारची प्रकरणे हाती घ्यावी, अर्थात त्यांचा अंतिम निकाल त्यांच्यावरच सोपवला जावा:

 • तक्रार संबोधित करण्यासाठी जिथे स्थानिक रचना अस्तित्वात नाही;
 • जिथे स्थानिक रचना प्रकरणे हाताळू शकत नाही किंवा अंतिम निर्णय घेण्यासाठी त्यांना ती प्रकरणे समितीकडे पाठवणे आवश्यक आहे;
 • तीव्र पद्धतशीर समस्या;

U4C च्या सदस्यांना सार्वजनिक नसलेल्या माहितीचा मार्ग/ प्रवेश प्रदान केला जाण्यासाठी, ते एका अ-प्रगटीकृत करारावर स्वाक्षरी करतील.

प्रतिबंधात्मक कार्य (UCOC चे अनुच्छेद 1 आणि 2)

सार्वजनिक Wikimedia फाउंडेशन विकिजच्या वापरकर्त्यांना आणि UCOC अंतर्गत इतरांना त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देणे आणि संहितेच्या स्वैच्छिक आसंजनाचा प्रचार करणे हे प्रतिबंधात्मक कार्याचे ध्येय आहे.

स्वैच्छिक आसंजनासाठी UCoC अनुवादाच्या शिफारसी:

UCoC ची मूळ आणि कायदेशीररित्या बंधनकारक आवृत्ती इंग्रजीमध्ये आहे. Wikimedia प्रकल्पांवर वापरल्या जाणाऱ्या इतर भाषांमध्ये तिचा अनुवाद केला जावा. मूळ इंग्रजी आवृत्ती आणि अनुवादात काही फरक आढळल्यास, मूळ इंग्रजी आवृत्तीला अग्रक्रम दिला जातो.

समुदाय आणि फाउंडेशनच्या कर्मचाऱ्यांमध्ये UCoC संमतीच्या शिफारसी:

Wikimediaच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रकल्पांमध्ये आणि स्पेसेसमध्ये परस्परसंवाद साधणाऱ्या आणि योगदान देणाऱ्या सर्वांना UCoC लागू होते. खालील व्यक्तींनी दुजोरा देणे आवश्यक आहे (स्वाक्षरी केलेल्या घोषणापत्राद्वारे किंवा अन्य फॉरमॅट निर्धारीत करणे) की ते वैश्विक आचार संहितेचा आदर राखतील आणि तिचे पालन करतील:

 • सर्व Wikimedia फाउंडेशन कर्मचारी, मंडळाचे सदस्य, संलग्न कर्मचारी आणि कंत्राटदार;
 • वर्धित अधिकार असलेले वापरकर्ते जसे की, परंतु यांच्यापुरतेच मर्यादित नाही: प्रशासक, नोकरशहा, कारभारी, इंटरफेस प्रशासक, प्रगत प्रशासकीय अधिकारी;
 • कोणतीही व्यक्ती, Wikimedia फाउंडेशनचे कर्मचारी किंवा ज्याला पुढील बाबतीत Wikimedia फाउंडेशनचे व्यापार चिन्ह वापरायचे आहे जसे की, परंतु मर्यादित नाही: Wikimedia व्यापारचिन्ह ब्रँडिंग केलेले कार्यक्रम (जसे की कार्यक्रमाच्या नावामध्ये त्यांचा समावेश करणे) आणि एखाद्या कार्यक्रमात Wikimedia संघटना, समुदाय किंवा प्रकल्पाचे सादरीकरण (जसे की, याच्यापुरते मर्यादित नाही, सादरकर्ता किंवा बूथ ऑपरेटर);
 • कोणतीही व्यक्ती, जी औपचारिक, ऑन किंवा ऑफ विकि दस्तऐवजीत Wikimediaवर संलग्नता मिळवू इच्छित आहे (जसे की, परंतु इतकेच मर्यादित नाही: एखादी व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह ज्यांना संशोधन सेटिंगमध्ये विकिवर किंवा बाहेर, Wikimedia प्रायोजित कार्यक्रम, समूह, अभ्यासाचा प्रचार करायचा आहे आणि/किंवा सहयोग करायचा आहे);
 • UCoC साठी संहिता अंमलबजावणी अधिकाऱ्याची कर्तव्ये पार पाडत असलेली कोणतीही व्यक्ती

समुदायामध्ये UCoC प्रशिक्षण/शिक्षणाच्या शिफारसी:

स्थानिक समुदाय, फाउंडेशन आणि संलग्न संस्थांनी समुदाय सदस्यांसाठी प्रशिक्षण तयार करून त्याची अंमलबजावणी करावी ज्यायोगे ते छळामुळे होणारे नुकसान ओळखू, संबोधित करू शकतील आणि दूर करू शकतील. वापरकर्त्यांसाठी असलेल्या प्रशिक्षणामध्ये, कोणते वर्तन अनैतिक मानले जाते हे ओळखण्याबाबत निदान मार्गदर्शक तत्वे आणि साधने, तसेच छळ केला जात असेल, तेव्हा कसा प्रतिसाद द्यावा याबाबत माहिती पुस्तिका समाविष्ट असावी.

 • प्रशिक्षणामध्ये खालील स्तर प्रमाणपत्रे असतील:
  • स्तर 1: UCoC चे एकंदरीत मूलभूत ज्ञान
  • स्तर 2: UCoC उल्लंघन हाताळण्याची क्षमता
  • स्तर 3: UCoC अपील हाताळण्याची क्षमता
  • स्तर 4: छळ झालेल्यांना योग्य मार्गांनी मदत करणे (पाहा छळ विरोधी कार्यक्रम - Meta - Wikimedia Meta-विकि)
 • UCoC ची लिंक यावर असावी:
  • वापरकर्ता नोंदणी पृष्ठे;
  • लॉग आउट केलेला वापरकर्ता संपादित करेल तेव्हा पुष्टीकरण पृष्ठे संपादित करा;
  • Wikimedia प्रकल्पांवरील फूटर्स;
  • मान्यताप्राप्त संलग्न संस्था आणि वापरकर्ता समुहांच्या वेबसाईट्सवर फूटर्स;
  • वैयक्तिक कार्यक्रमांत ठळकपणे प्रदर्शित केली जाते;
  • योग्य वाटेल तिथे अन्यत्र कुठेही

प्रतिसादात्मक कार्य (UCOC चा अनुच्छेद 3)

अहवाल दिलेल्या प्रकरणांमध्ये प्रक्रिया करण्यासाठी आणि दाखल करण्यासाठी मार्ग प्रदान करणे, प्रकरणांवर प्रक्रिया करण्यासाठी संसाधने प्रदान करणे, भिन्न प्रकारच्या उल्लंघने आणि अंमलबजावणी यंत्रणांसाठी व्याख्या, तसेच अहवाल सादर करण्याच्या साधनांबाबत सूचना आणि अपील करण्याचे मार्ग प्रदान करणे हे प्रतिसादात्मक कार्याचे ध्येय आहे.

अहवाल दिलेल्या प्रकरणांमध्ये प्रक्रिया करणे आणि दाखल करणे यासाठी तत्त्वे

 • ज्या व्यक्तीचा छळ झाला आहे तिला, तसेच ती घटना पाहणाऱ्या, त्यात सहभागी नसलेल्या तृतीय पक्षाला, UCoC उल्लंघनांबाबत अहवाल देणे शक्य व्हावे;
 • जेव्हाही शक्य आणि योग्य असेल, तेव्हा प्रशासकीय बंदीऐवजी मध्यस्थी करून प्रकरणांचे निराकरण केले जावे;
 • शक्य तितक्या वाजवी कालावधीत प्रकरणांचे निराकरण केले जावे;
 • समर्थित परिस्थितींमध्ये प्रकरणांना प्राधान्य दिले जावे;
 • तपासाची आवश्यकता नाही अशा स्पष्टपणे असमर्थित (जसे की,यांच्यापुरते मर्यादित नाही: वाईट भावनेने अहवाल देणे) अहवालांमध्ये त्यांची विल्हेवाट लावली जावी (प्रकरणाचा आयडी वैध ठेवावा);
 • साधी प्रकरणे, जसे की, यांच्यापुरते मर्यादित नाही, साधा विध्वंस झाला असेल, तर संपादन आणि विघटन हाताळण्यासाठी विकिमध्ये असलेल्या नेहमीच्या प्रक्रियांद्वारे त्याचे निराकरण केले जावे;
 • योग्य असेल, तिथे प्रकरणे पुढे पाठवली जावी किंवा एस्कलेट केली जावी;
 • ज्या व्यक्तीने (पगारी कर्मचारी, निवडून आलेला किंवा निवडलेला वापरकर्ता, स्वयंसेवक इ.) UCoC चे उल्लंघन केले आहे त्याच्या जबाबदाऱ्यांनुसार, उल्लंघनाचे स्वरूप आणि गांभीर्यानुसार अंतिम निर्बंधलागू केले जातात;
 • अपील करणे शक्य असावे आणि अपील केलेला निर्णय जारी करणाऱ्या मंडळाव्यतिरिक्त भिन्न मंडळाने अपीले हाताळावीत.

प्रकरणांवर प्रक्रिया करण्यासाठी संसाधने प्रदान करणे

ArbComs द्वारे Wikimedia प्रकल्पांचे कव्हरेज/ क्षेत्र खाली सुचवलेल्या तरतुदींद्वारे जास्तीत जास्त वाढवले जावे:

 • अधिक प्रभावी UCoC प्रकल्प अंमलबजावणी प्रणाली तयार करण्यासाठी एकाच भाषेतील भिन्न प्रकारच्या प्रकल्पांमध्ये एक सामायिक ArbCom राखण्याच्या पर्यायाची समितीद्वारे प्रकल्पांना शिफारस केली जाते.
 • बऱ्यापैकी मोठ्या असलेल्या प्रकल्पांच्या समूहात एक (हे मोजण्यासाठी मेट्रिक्सकरिता वर्तमान सूचनांमध्ये समावेश होतो: सक्रिय वापरकर्ते, सक्रिय प्रशासक. हे तपशील Wikimedia फाउंडेशनने U4C सह स्पष्ट करून सांगावेत, अशी समिती शिफारस करते) ArbCom असण्यासाठी जोरदार प्रोत्साहन दिले जाते;
 • असे सामायिक ArbCom विकिपिडियाकेंद्रित नसेल हे सुनिश्चित करावे, इतर गोष्टींबरोबरच यास एक प्रकल्प-तटस्थ डोमेन प्रदान करावे, उदाहरणार्थ "id.wikiarbcom.org";
 • सहभागी समुदायांमध्ये यासाठी समर्थन असल्यास, भिन्न भाषांमध्ये असे ArbCom सामायिक करण्यास अनुमती द्यावी.

उल्लंघने आणि अंमलबजावणी यंत्रणा / समूहांचे प्रकार

या विभागामध्ये भिन्न प्रकारच्या उल्लंघनांची सर्वसमावेशक नसलेली यादी (ठळक दर्शवलेली), तसेच त्याच्याशी संबंधित अंमलबजावणी यंत्रणा तपशीलवार दिलेली असेल.

 • कोणत्याही प्रकारच्या शारीरिक हिंसाचाराच्या धमक्यांचा समावेश असलेली उल्लंघने:
 • विश्वास व सुरक्षेद्वारे हाताळली जातात
 • विवाद किंवा कायदेशीर धमक्या समाविष्ट असलेली उल्लंघने
 • ही प्रकरणे तत्परतेने Wikimedia फाउंडेशनच्या कायदा संघाकडे किंवा जिथे योग्य असेल, तिथे धमक्यांच्या गुणवत्तेचे योग्य मूल्यमापन करू शकणाऱ्या इतर व्यावसायिकांकडे पाठवली जातील.
 • संलग्न शासनाशी संबंधित उल्लंघने
 • AffCom द्वारे हाताळली जातात
 • UCoC चे अनुसरण करण्यातील पद्धतशीर अपयश
 • “U4C समिती” द्वारे हाताळले जाते;
 • प्रशासकीय पातळीवर UCoC ची क्रॉस-विकि उल्लंघने “U4C समिती” द्वारे हाताळली जातील
 • ऑफ-विकि उल्लंघने (उदाहरणे, जसे की, परंतु मर्यादित नाहीत: व्यक्तीशः थॉन्स संपादित करणे किंवा ऑफ-विकि घटना, जसे की यांच्याशी समान इतर प्लॅटफॉर्म्सवर: सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्स, चर्चा याद्या)
 • कार्यक्रमाचे संयोजक किंवा स्थानिक संलग्न गटांद्वारे “U4C समिती” कडे प्रकरण संदर्भित केले गेले, तर त्यांच्याकडून हाताळले जाते
 • ऑन-विकि UCoC उल्लंघने
 • क्रॉस-विकि UCoC उल्लंघने: थेट किंवा जागतिक प्रशासककिंवा कारभाऱ्यांकडून किंवा सिंगल-विकि UCoC उल्लंघने हाताळणाऱ्या मंडळांकडून संदर्भित म्हणून “U4C समिती” द्वारे हाताळली जातात;
 • गल-विकि UCoC उल्लंघने: वैयक्तिक Wikimedia प्रकल्पांद्वारे, त्यांच्या विद्यमान मार्गदर्शक तत्वांनुसार हाताळली जातात (उदाहरणे, जसे की, परंतु मर्यादित नाहीत: तोडफोड, पूर्वग्रह किंवा चुकीची माहिती सादर करणे, सत्तेचा गैरवापर करणे, चोरीला प्रतिबंध करणे)

अहवाल देण्याच्या आणि प्रक्रिया करण्याच्या साधनासाठी शिफारसी

UCoC उल्लंघनांचा अहवाल देणे आणि त्यावर प्रक्रिया करणे यातील तांत्रिक अडथळा कमी करण्यासाठी, UCoC उल्लंघनांसाठी अहवाल देण्याचे आणि प्रक्रिया करण्याचे एक मध्यवर्ती साधन Wikimedia फाउंडेशनद्वारे मीडियाविकि विस्तार म्हणून विकसित केले जावे. या अहवाल देण्याच्या साधनाने तक्रारदाराला UCoC उल्लंघनाचे, तसेच स्वतःबद्दल आणि समाविष्ट असलेल्या इतर समुदाय सदस्यांबाबत तपशील प्रदान करण्याची परवानगी दिली पाहिजे.

अहवालांमध्ये कारवाई करण्यायोग्य पुरेशी माहिती समाविष्ट असावी किंवा हातातील प्रकरणाबाबत उपयुक्त अहवाल प्रदान करावा. यामध्येमाहितीचा समावेश होतो, परंतु इतकी मर्यादित नाही:

 • अहवाल दिलेले वर्तन ज्याप्रकारे वैश्विक आचार संहितेचे उल्लंघन करते;
 • UCoC च्या या उल्लंघनामुळे कोणाला किंवा काय नुकसान पोहोचते;
 • ही घटना किंवा घटना घडल्या ती तारीख व वेळ;
 • जिथे घटना घडली ते स्थान/ती स्थाने;
 • अंमलबजावणी मंडळांना योग्य निवाडा करता येण्यासाठी इतर अनुरूप माहिती.

वापर सुलभता, खाजगीत्व आणि निनावीपणा, प्रक्रियेतील लवचिकता आणि पारदर्शक दस्तऐवजीकरण या तत्वांतर्गत साधन काम करू शकले पाहिजे:

गोपनीयता आणि निनावीपणा
 • अहवाल एक तर सार्वजनिकरित्या (जिथे प्रकरणाचे सर्व तपशील सर्वसाधारण जनतेला पाहता येतील) किंवा विविध प्रमाणात गोपनीयतेसह तयार करावे (उदाहरणार्थ, अहवाल देणाऱ्याचे नाव जनतेपासून लपवले जाते; अहवाल देण्यात वर्तनात सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तींचे वापरकर्तानाव जनतेपासून लपवले जाते; आणि इतर संभाव्य उदाहरणे);
 • गोपनीयता वाढविल्यामुळे निवारणासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांवर मर्यादा येऊ शकते हे स्पष्ट करा - उदाहरणार्थ, प्रशासकीय बंदींना पर्याय म्हणून सार्वजनिक मध्यस्थी पूर्णपणे खाजगी अहवालास कदाचित अनुरूप नसू शकते;
 • लॉग इन केल्यावर किंवा लॉग आउट केल्यावर अहवाल तयार करण्यास अनुमती द्या
प्रक्रिया करणे
 • UCoC उल्लंघनांचे निराकरण करण्याचे अधिकार असलेल्या मंडळांद्वारे अहवालांवर खाजगीपणे प्रक्रिया करण्यास अनुमती द्या;
 • संबंधित मंडळांकडे अहवाल पुढे पाठवले जाण्यास अनुमती द्या;
 • UCoC उल्लंघनांच्या चालू असलेल्या अहवालांसह व्यक्तीशः किंवा ऑफ-विकि अहवाल तयार करण्यास अनुमती देण्यासह, तक्रारीचा समान प्राप्तकर्ता असलेल्या वर्तमान प्रकरणांची मागील प्रकरणांशी सांगड घाला;
 • या समान अहवाल यंत्रणेमध्ये व्यक्तीशः अहवाल सामावून घेण्याचा किंवा कागदोपत्री नोंद करण्याचा मार्ग प्रदान करा;
 • वाईट भावनेने दिलेल्या अहवालांची प्रकरणे वेगळी करणाऱ्यांना अनुमती द्या
पारदर्शक दस्तऐवजीकरण
 • अ-सार्वजनिक प्रकरणांतील गोपनीयता आणि सुरक्षा राखून, शोधता येणाऱ्या पद्धतीने सर्व प्रकरणे सार्वजनिकरित्या संग्रहित करण्याचा मार्ग प्रदान करा;
 • सार्वजनिकपणे दिसण्यासाठी प्रत्येक प्रकरणाला एक अनन्य सार्वजनिक ओळखकर्ता नियुक्त करा;
 • किमान डेटा / माहिती संकलनाच्या आणि आमच्या समुदाय सदस्यांच्या गोपनीयतेचा आदर करण्याच्या आमच्या तत्वांस अनुसरून, UCoC अंमलबजावणीबाबतच्या माहितीचा अहवाल देण्याच्या उद्देशांसाठी, या साधनाच्या वापराबाबत मूलभूत आकडेवारीनुसार मर्यादित डेटा संकलनास अनुमती द्या.

UCoC ची अंमलबजावणी करण्याचे अधिकार असलेल्या व्यक्तींनी हे साधन वापरणे आवश्यक नाही आणि त्यांना जी साधने आवश्यक किंवा योग्य वाटतील त्यांसह काम करत राहू शकतात, फक्त त्या साधनांमुळे वापर सुलभता, गोपनीयता आणि निनावीपणा, प्रक्रियेतील लवचिकता आणि पारदर्शक दस्तऐवजीकरण याच तत्वांनुसार प्रकरणे हाताळता किंवा तयार करता आली पाहिजेत.

स्थानिक अंमलबजावणी रचनांसाठी शिफारसी

जिथे शक्य असेल, तिथे आम्ही वर नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार विद्यमान अंमलबजावणी रचनांना UCoC उल्लंघने प्राप्त करण्याची व हाताळण्याची जबाबदारी घेण्यास प्रोत्साहन देते. UCoC ची अंमलबजावणी संपूर्ण चळवळीमध्ये सातत्यपूर्ण राहील याची खात्री करण्यासाठी, वैयक्तिक प्रकल्पाच्या मापनपट्टीवर UCoC उल्लंघने हाताळताना खालील तत्वे लागू केली जावी, अशी आम्ही शिफारस करतो.

प्रशिक्षण आणि सहाय्य
 • नियुक्त व्यक्तींच्या ओळखीच्या नसलेल्या भाषांमध्ये जेव्हा अहवाल प्रदान केले जातात, विशेषतः जेव्हा यांत्रिक अनुवाद अपुरा किंवा समस्यापूर्ण असतो, तेव्हा अनुवादासाठी Wikimedia फाउंडेशन संसाधने प्रदान करते;
 • योग्य प्रक्रिया कशा लागू कराव्या आणि UCoC प्रत्यक्ष वापरात समजावून घेण्यासाठी कार्यकर्ते आणि कर्मचाऱ्यांसाठी एक प्रशिक्षण प्रक्रिया
प्रक्रियेमध्ये निःपक्षपातीपणा
 • प्रशासक किंवा इतर विवादात जवळून सहभागी असताना त्यांना अहवालापासून कधी दूर किंवा विलग करावे हे ठरविण्यात सहाय्यक हितसंघर्ष धोरणे मदत करतात.
 • विद्यमान Wikimedia लवाद प्रक्रियांनुसार, विवादात नाव असलेल्या कोणीही स्वतःला प्रकरणापासून दूर ठेवावे;

आम्ही शिफारस करतो की फाउंडेशन कार्याने एक अशी प्रणाली तयार करावी, जिथे एखाद्या विशिष्ट प्रकल्पात आपल्याला सुरक्षित वाटते की नाही हे योगदानकर्ते सुरक्षितपणे व्यक्त करू शकतील.

स्थानिक प्रशासकांतील स्पष्ट संवाद
 • पुनरावलोकन आणि निर्णय घेण्यास समर्थन देण्यासाठी प्रशासकांना इतर प्रशासकांसह एकत्र काम करण्यासाठी स्पेसेस, मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रोत्साहन, विशेषत: जेव्हा एखादी समस्या जटिल असते (उदा. ज्यात अनेक लोक सामील असतात किंवा लांबलचक पृष्ठाच्या इतिहासाचे पुनरावलोकन करणे समाविष्ट असते)
प्रक्रियेची पारदर्शकता
 • विद्यमान समुदाय आणि/किंवा Wikimedia फाउंडेशनने भिन्न, सामान्य प्रकारच्या छळाच्या तीव्रतेबाबत कागदपत्रे प्रदान करावी, जी भिन्न निष्पत्ती मोजण्यासाठी वापरता येतील. योग्य तीव्रता स्वतः ठरविण्यासाठी या शिफारसी वापरण्यास सहयोगी प्रशासक किंवा इतर अंमलबजावणी मंडळांना मदत होईल

प्रकल्पाबाहेर अनधिकृत किंवा अर्ध-अधिकृत स्पेसेसमध्ये (उदा. डिसकॉर्ड, टेलिग्राम, इ.) होणाऱ्या Wikimedia-विशिष्ट संभाषणांना, Wikimediaच्या वापराच्या अटी लागू होणार नाहीत. त्या विशिष्ट सोशल मीडिया किंवा चर्चा प्लॅटफॉर्मच्या वापराच्या अटी आणि आचार धोरणे यांना लागू होतात. असे असले तरी, या नेटवर्क्स आणि प्लॅटफॉर्म्सवरील विकिमीडियन्सचे वर्तन हे UCoC उल्लंघनांच्या अहवालांतील अतिरिक्त पुरावा म्हणून स्वीकारले जाऊ शकते. आम्ही सुचवतो की प्रकल्पाबाहेरील स्पेसेस अशी मार्गदर्शक तत्वे तयार करतात जी ऑन-विकि संघर्ष तृतीय पक्षाच्या प्लॅटफॉर्म्सवर निर्यात करण्यास परावृत्त करतात.

अपीलांवर कशी प्रक्रिया करावी याबाबत शिफारसी

ज्या व्यक्तींनी UCoC चे उल्लंघन केल्याचे आढळेल त्यांना अपील करण्याची संधी असावी. UCoC चे उल्लंघन झाले आहे किंवा नाही, तपास ज्याप्रकारे केले गेले किंवा UCoC चे उल्लंघन(ने) केल्यामुळे व्यक्तींवर लादलेली बंदी या निर्णयाविरुद्ध अपील केली जाऊ शकतात. अंमलबजावणीच्या प्रारंभीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी नसलेल्या तृतीय पक्षाद्वारे अपील हाताळली जावीत आणि त्या तृतीय पक्षाचे निर्धारण खालील घटकांवर आधारीत असावे:

 • UCoC च्या प्रारंभिक उल्लंघनाची तीव्रता;
 • सहभागी व्यक्तींनी केलेल्या UCoC उल्लंघनांचा पूर्व इतिहास;
 • UCoC उल्लंघनात सहभागी असलेल्या व्यक्तीविरुद्ध बंदींची तीव्रता;
 • UCoC उल्लंघनामुळे विशिष्ट व्यक्ती, संपादकांचे वर्ग आणि एकंदर प्रकल्पांवर पडणारा प्रभाव आणि नुकसान

एखादे अपील घ्यावे किंवा नाही किंवा त्यास अनुमती द्यावी किंवा नाही हे निवडताना, स्थानिक अंमलबजावणी मंडळे अतिरिक्त घटक किंवा त्यांच्या महत्त्वाबाबत विचार करण्यासाठी निवडणूक घेऊ शकतात. प्रत्येक प्रकल्पासाठी अपील प्रक्रियेचे विशिष्ट लॉजिस्टिक तपशील त्यांच्या स्वतःच्या निर्धारणावर सोडले जातात. मूळ उल्लंघन ज्या भाषेत हाताळले गेले आहे ती भाषा पुनरावलोकनकर्ता तृतीय पक्ष बोलत नसल्यास, त्यांना स्थानिक अंमलबजावणी मंडळांद्वारे अनुवाद सहाय्य केले जावे.

भविष्यवेध

कृपया लक्षात ठेवा की या दस्तऐवजामध्ये दिलेली UCoC अंमलबजावणी मार्गदर्शक तत्वे पुनरावृत्ती करणारी आहेत आणि समुदायाचा अभिप्रायांनुसार, वैश्विक आचार संहितेसह त्यांचे निरंतर मूल्यांकन केले जाईल आणि ती विकसित होत राहतील. या मसुद्याच्या संदर्भात विचार करण्यासाठी समितीने समुदायाला प्रश्न प्रदान केलेले आहेत.

विकसित केल्यावर अहवाल सादर करण्याच्या साधनांवरील प्रयोग आणि “U4C समिती” पहिल्या वर्षाच्या संक्रमण कालावधी दरम्यान होईल. वर्ष समारोपानंतर, अहवाल सादर करण्याच्या साधनांबाबत निरीक्षणे वापरून त्यात बदल करता येतील आणि अंमलबजावणी समितीची कार्ये जास्त अचूकपणे विशद करता येतील.

समुदायासाठी खुले प्रश्न

 • एस्कलेशन: तक्रारी कुठे जातात, कोणत्या घटना/मंडळ/न्यायाधीशांनी त्यावर प्रक्रिया करणे अपेक्षित आहे.
 • अपीलासाठी नियमने (आधीच्या ”तक्रारी कुठे जातात” या प्रश्नाचे उत्तर दिल्यावर).
  • U4C समितीने वैयक्तिक प्रकरणे सुद्धा ठरवावी किंवा अपीलांवर प्रक्रिया करावी का?
  • एखाद्याने UCoC च्या उल्लंघनाबाबत नेमके कधी अपील करावे?
  • अपील मंजूर करण्यापूर्वी कोणत्या प्रकारचे वर्तन किंवा पुरावा आपल्याला पाहायचा आहे?
  • अपीलांची प्रक्रिया कोणी हाताळावी?
  • एखाद्याला UCoC उल्लंघनाबाबत निर्णयावर किती वारंवारितेने अपील करण्यास अनुमती द्यावी?
 • वैयक्तिक विकिमिडिया प्रकल्प UCoC ची अंमलबजावणी कशी करतात हे त्यांना कोणत्या मर्यादेपर्यंत ठरवू द्यावे?
 • U4C समितीसाठी लोकांची निवड कशी केली जाईल?
  • आमच्या वापरकर्त्यांच्या वर्तमान शिफारस केलेल्या यादीमध्ये ज्यांचा समावेश होतो, परंतु ते मर्यादित नाहीत: प्रगत प्रशासकीय अधिकारी, पर्यवेक्षक, नोकरशहा, स्थानिक प्रकल्पांचे प्रशासक, लवाद समिती सदस्य, Wikimedia फाउंडेशनचे कर्मचारी, सहयोगी इ.)
  • “U4C” समिती स्थापन केली जात असताना अंतरिम समितीची रचना केली जावी का?
 • तांत्रिक आचार संहिता समितीसारख्या जागतिक आचार समित्यांचे प्रस्तावित U4C मध्ये विलिनीकरण केले जावे का?

संदर्भ

 1. Users with advanced permissions, such as, but not limited to: administrators, bureaucrats etc.