User:CKoerner (WMF)/Support for our communities across India/mr

This page is a translated version of the page User:CKoerner (WMF)/Support for our communities across India and the translation is 100% complete.

Please help translate to your language

भारतातील समुदायांच्या मदतीसाठी

सर्वांना नमस्कार,

जगभरातील अनेक संस्था, व्यक्ति, गट, स्वयंसेवक आणि या सर्वांच्या जाळ्यांच्या मदतीने विकिमिडीयाचे सर्व प्रकल्प उभे रहातात आणि सांभाळले जातात. आपण सगळे एकत्र येऊन विकिमिडीयाच्या प्रकल्पांना वाढवूयात समृद्ध करुयात आणि विकिमिडीयाचे मुक्त ज्ञानाची मोहिम पुढे नेऊयात.

तुम्ही अफिलियेशन कमिटीच्या विकिमिडीया इंडिया विभागाला बरखास्त करण्याच्या निर्णयाबद्दल ऐकलेच असेल. काही समुदायांनी त्यावर भारतातील विकिमिडीया समुदायांच्या भवितव्याबद्दल प्रश्न उभे केले आहेत. अफिलियेशन समितीच्या निर्णयाबद्दल जास्तीची माहिती देण्याच्या हेतुने आम्ही हे लिहित आहोत, शिवाय आम्ही भारतातील समुदायांना आमची मदत चालू ठेवण्याचीही हमी आम्ही देत आहोत.

अफिलियेशन कमिटी ही समुदायातील काही सदस्यांची बनलेली असते. या कमिटीच्या माध्यमातून विकिमिडीया भारत बरोबर काम करताना आणि विकिमिडीया भारत विभागाला (chapter requirements) नियमांशी ताडून बघताना, जुन २०१९ मध्ये असा निर्णय घेतला की, विकिमिडीया प्रतिष्ठान विकिमिडीया भारत विभागाशी असलेला कराराचे नुतनिकरण करणार नाही.

२०११ मध्ये सर्वप्रथम विकिमिडीया भारत विभागाची स्थापना करण्यात आली होती. २०१५ मध्ये विभागाच्या कारभारात आणि अपेक्षित कामांमध्ये समस्या असल्याचे समोर आले होते. अफिलियेशन कमिटी आणि प्रतिष्ठानच्या मदतीने भारत विभागाने कामाचा आराखडा आखला आणि भारत विभाग २०१७ पर्यंत आपल्या योग्य मार्गावर आणि विभागाच्या विकिमिडीया प्रतिष्ठाननी ठरवून दिलेल्या अपेक्षांची पुर्तता करायला सुरूवात केली. पण पुन्हा २०१७ ते २०१९ दरम्यान भारत विभागाला विश्वासार्हता मिळवण्यास अडचणी आल्या. शिवाय हा विभाग विकिमिडीया प्रतिष्ठानकडून वित्तसहाय्य मिळवण्यासाठीच्या कायदेशीर अटींची पुर्तता करण्यासही अपूरा पडलेला आहे. पण प्रतिष्ठानला आणि अफिलियेशन कमिटीलाही अशी पूर्ण खात्री आहे की, या विभागाकडून लवकरच या कायदेशीर गरजांची पुर्तता केली जाईल.

आम्ही विकिमिडीया चळवळीच्या माध्यमातून भारतात उभ्या रहात असलेल्या नेतृत्वाचे खूप आभारी आहोत, इथल्या नेतृत्वाने जगभरातल्या चळवळीवर लक्षणिय परिणाम केला आहे. सध्या भारतातल्या आठ भाषीक समुदायांच्या सदस्य गटांना आम्ही मदत करत आहोत आणि आणखीन दोन गटांना अफकोमच्या निर्णयाने मान्यता मिळण्याची शक्यता आहे. भारतातून आम्हांला एकूण ७०० दशलक्ष वाचक भेटी दर महिन्याला मिळतात. आणि भारतीय समुदायांचा विकास हा आमच्या विकिपीडिया आणि विकिमिडीया प्रकल्पांच्या विकासाचा महत्वाचा भाग आहे.

विकिमिडीया चळवळीसाठी भारताचे प्रजासत्ताक राज्य हे महत्वाचे ठिकाण आहे. विकिमिडीया प्रतिष्ठानचे स्वयंसेवक सदस्यांना, वाचकांना, दात्यांना मदत करण्याचे काम आम्ही चालू ठेवणार आहोत. आमच्या मुक्त ज्ञान प्रकल्पांना आणि विकिमिडीया प्रकल्पांना योगदान देण्याचे काम जोमाने करत आहात याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आम्हांला अशी आशा आहे की, आपण असेच एकत्र काम करत राहू.

विकिमिडीया प्रतिष्ठानच्या वतिने,

वालेरीये डिकोस्टा
समुदाय जोडणी प्रमुख
विकिमिडिया प्रतिष्ठान