विकिमिडिया फाऊंडेशन ("we", किंवा "us") हे ना-नफा तत्त्वावर चालणारी संस्था आहे,जी, लोकांना सशक्त करण्यास व जगातील लोकांना, शैक्षणिक आशय गोळा करुन तो मुक्त परवान्यांतर्गत किंवा सार्वजनिक अधिक्षेत्रांमध्ये संवर्धन करुन व योग्य रितीने त्याचा वैश्विकरित्या प्रसार करण्यास, समर्पित आहे.
आपण व आपला सदस्य गट ("आपण") आपल्या सदस्य गट अर्जातील "I agree" हे टिचकून,या करारातील शर्ती मान्य करत आहात.
आपण आमच्या व्यापारचिन्हाच्या नीतीचे अनुपालन कराल
आपण आमची व्यापारचिन्ह नीती वाचलेली असून त्याचे अनुपालन करण्याचे मान्य करत आहात.आपण कधी मुक्तपणे विकिमिडिया प्रतीकचिन्हाचा वापर करु शकता व आपणास केंव्हा परवानगी घ्यावयास हवी ते, ही नीती स्पष्ट करते.
आपण विकिमिडिया फाऊंडेशन व इतर गटांपासून स्वतंत्र आहात
हा करार, विकिमिडिया फाऊंडेशन किंवा विकिमिडियाच्या इतर संस्थांसमवेत आपली नेमणूक,अभिकर्ता किंवा भागीदारी संबंध निर्माण करीत नाही.आपण हे सत्य कबूल करता व समजता कि आपण व विकिमिडिया फाऊंडेशन हे एकमेकांपासून स्वतंत्र आहेत. आपण व आपला सदस्यगट हे, विकिमिडिया फाऊंडेशनच्या वतीने कोणत्याही प्रकारे बोलू अथवा कोणतेही कार्य करु शकत नाही.
आपण या कराराचे जोपर्यंत पालन करता तोपर्यंत, आपणास सदस्यगट म्हणून मान्यता आहे
हा करार,संलग्नन समितीतर्फे आपल्या सदस्यगटास मान्यता मिळाल्याच्या दिनांकापासून एक वर्षात संपेल.हा करार,जर तो संपुष्टात आणल्या गेला नाही तर, पुढील एक वर्षासाठी आपोआप नुतनीकृत होईल.
- आम्ही ३० दिवसांची लिखीत दखलपत्र(नोटिस) देऊन हा करार कोणत्याही वेळेस रद्दबातल करु शकतो.जर आपण आचारसंहितेचा भंग केला तर संलग्नन समिती ही ताबडतोब हा करार संपुष्टात आणू शकते.आपणही, कोणत्याही वेळेस संलग्नन समितीस दखलपत्र(नोटिस) पाठवुन हा करार संपुष्टात आणू शकता.
आपल्या सदस्यगटाचे नाव व प्रतीकचिन्ह
- संलग्नन समिती ही आपणास मान्यताप्राप्त नाव पुरवेल, बहुदा "Wikimedia Community User Group [area or topic] या स्वरुपात.आपले नाव हे सदस्य गट नाम मार्गदर्शिका याचेशी सुसंगत हवे.
- विकिमिडिया फाऊंडेशन आपणास आपले मान्यताप्राप्त नाव वापरुन,आचारसंहितेस व या करारास सुसंगत असे क्रियाकलाप करण्यास परवानगी देते. आपला करार रद्दबातल झाल्यास ही परवानगी संपुष्टात येईल.
- आपण आपला गटाच्या ओळखीसाठी Wikipedia affiliative logo किंवा Wikimedia community logo हा मुक्तपणे वापरु शकता.जर आपणास इतर विकिमिडिया लोगो वापरायचा असेल तर,( व्यापारचिन्ह नीती येथे परवानगी दिल्या व्यतिरिक्त)आपण विकिमिडिया फाऊंडेशन व्यापारचिन्ह चमूस:$trademarks-विपत्राने किंवा हे आवेदन भरुन आपण विनंती सादर करु शकता.
आमची आचारसंहिता
आपण आमची आचारसंहिता पाळावयासच हवी:
- आपल्या गटाची उद्दिष्ट्ये व क्रियाकलाप हे विकिमिडिया फाऊंडॅशन च्या उद्दिष्टांशी सुसंवाद साधणारे हवेत.विकिमिडिया मार्गदर्शक तत्त्वे याचेशी विसंवाद असणाऱ्या क्रियाकलांपांत किंवा इतर विकिमिडिया संस्था अथवा विकिमिडिया प्रकल्पांना शक्य अशी अर्थपूर्ण जोखीम सामोरी असल्यास,तेथे आपण गुंतु नये.
- आपण आमच्या दृश्य ओळखण मार्गदर्शिकेसमवेत आमची व्यापारचिन्ह नीती पाळावयास हवी.
- आपण एक मैत्रीपूर्ण व स-आदर असणारा गट चालविण्यास झटायला हवे व विकिमिडियाच्या मैत्रीपूर्ण चाल नीती सुसंवाद साधण्याची खात्री द्यावयास हवी.
- आपण आपल्या आदान-प्रदानात हे स्पष्ट करावयास हवे कि आपण स्वयंसेवकांचा एक स्वतंत्र गट आहात व आपण विकिमिडिया फाऊंडेशन किंवा विकिपीडिया नाहीत.
- विकिमिडिया प्रकल्पाचे विकिपानासह ज्यात आपल्या गटाचे वर्णन व त्याचे क्रियाकलाप आहेत आपण पारदर्शकपणे वागावयास हवे. तसेच,विकिमिडिया समाजास व विकिमिडिया फाऊंडेशनला आपले वार्षिक अद्यतन पुरवावयास हवे. आपण हा अहवाल मेटा-विकिवर अद्यतन म्हणून टाकावयास हवा.
- आपण विकिमिडिया फाऊंडेशनला आपल्या सदस्य गटातील दोन प्रतिनिधींची नावे व संपर्क-माहिती पुरवावयास हवी.या प्रतिनिधींना हा करार मान्य हवा. विकिमिडिया फाऊंडेशनच्या विनंतीनुसार, आपल्या प्रतिनिधींना त्यांची ओळख पटण्यास अधिकची माहिती विकिमिडिया फाऊंडेशनला द्यावी लागेल.त्या प्रतिनिधींची नावे सार्वजनिकरित्या आपल्या गटाच्या ओळखीसाठी वापरल्या जाउ शकतात.
- आपण अवैध कामात गुंतु नये व आपण सर्व वित्तीय आणि गुप्तता कायदे व नियमांचे अनुपालन करावयास हवे.
- आपण आपला गट चालविण्यास, सर्व संबंधित परवान्यांच्या गरजांची व इतर कायदेशीर दायित्वांची पूर्तता करावयास हवी व त्याचे नीट व्यवस्थापन करावयास हवे.
आमच्या शर्ती
कायद्यांच्या विसंवाद तत्वांस न मानता, हा करार, यूएसएच्या कॅलिफॉर्निया राज्याच्या कायद्याच्या आधिपत्याखाली येतो.संबंशित पक्ष, त्यांचेतील सर्व विवाद हे मध्यस्थीमार्फत सोडविण्याचा प्रयत्न करतील. मध्यस्थी विफल झाली तर,आम्ही सॅन फ्रान्सिस्को देशाच्या कॅलिफॉर्निया राज्याच्या अथवा संघराज्याच्या निव्वळ वैयक्तिक अधिकारक्षेत्रास अनुमती देऊ व तो विवाद सोडवु.
विकिमिडिया फाऊंडेशनला हा सदस्य गट करार वेळोवेळी फेरफारीत करणे आवश्यक असेल.या करारात होणार असलेल्या काहीही बदलांबाबत, आपले प्रतिनिधीस ३० दिवसांचे आधी विपत्राद्वारे दखलपत्र(नोटिस) मिळेल.
यातील प्रत्येक पक्षाने या करारावर, लागू असणाऱ्या दिनांकाला, स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
विकिमिडिया फाऊंडेशन
द्वारे: _______________________________
नाव: ____________________________
शीर्षक: _____________________________
[नाव]
वैयक्तिकरित्या व या सदस्य गटाचा अभिकर्ता म्हणून
नाव: ____________________________
द्वारे: _______________________________
[नाव]
वैयक्तिकरित्या व या सदस्य गटाचा अभिकर्ता म्हणून
द्वारे: _______________________________
नाव: ____________________________
|