Training modules/dashboard/slides/10913-copyright/mr

This page is a translated version of the page Training modules/dashboard/slides/10913-copyright and the translation is 100% complete.

प्रतिमुद्राधिकार (कॉपीराइट)

छायाचित्र : टॉम मर्फी ७, CC-BY-SA

विकिपीडियावरील प्रत्येक गोष्ट ही वापरायला मुक्त असते. म्हणजे विकिपीडियावर आपण काहीही घातले तर तेही मुक्तपणे सामायिक करता येण्याजोगे असणार. प्रतिमुद्राधिकाराच्या (कॉपीराइटच्या) कक्षेत येणारी सामग्री उदा. एखाद्या पुस्तकातील लांबलचक उतारा, चित्रे, छायाचित्रे ही विकिपीडियाचा भाग असत नाही. आपण अशा सामग्रीच्या निर्मात्याला यथायोग्य श्रेय दिले आणि सामग्रीचा संदर्भ दिला तरीही ती सामग्री विकिपीडियाचा भाग ठरणार नाही.

ह्याला अपवाद म्हणजे अगदी जुनी, आता प्रतिमुद्राधिकारांतर्गत येऊ न शकणारी सामग्री. अशा सामग्रीला "सार्वजनिक क्षेत्रा"तील सामग्री म्हणतात. काही सामग्री ही एखाद्या मुक्त परवान्याअंतर्गत "सार्वजनिक क्षेत्रा"तील म्हणून वितरित करण्यात आलेली असते. तिचादेखील ह्यात अंतर्भाव करता येईल.

अशा परिस्थितीत आपण त्या माहितीच्या स्रोताचा संदर्भ दिला आहे आणि तिच्या कर्त्याने ती सामग्री एखाद्या मुक्त परवान्याअंतर्गत वितरित केली आहे हे दर्शवले आहे ह्याची (परवान्याचा थेट दुवा देऊन) खात्री करून घ्यावी.

तथापि हे लक्षात घ्या की लांबलचक उद्धृते ही सामान्यतः उचित नसतात. त्यामुळे माहिती आपल्या शब्दांत लिहून काढणे हाच सगळ्यात उत्तम मार्ग आहे.