WWC2023/शिष्यवृत्ती

This page is a translated version of the page WWC2023/Scholarship and the translation is 94% complete.

WikiWomenCampची तिसरी पुनरावृत्ती नवी दिल्ली, भारत मध्ये २० ते २२ येथे ऑक्टोबर २०२३ आयोजित केली जाईल. विस्तार, नेतृत्व आणि संबंधांवर केंद्रित असलेल्या परिवर्तनीय अनुभवासाठी आमच्यात सामील व्हा. या वर्षीचा विषय महिला सक्षमीकरणावर आणि सामाजिक अडथळ्यांवर मात करण्याचा "मॅप अप, राइज अप," असा आहे.

शिष्यवृत्ती म्हणजे काय?

एखाद्या व्यक्तीला कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्याशी संबंधित खर्चाची पूर्तता करण्यासाठी दिलेली आर्थिक मदत म्हणजे ही शिष्यवृत्ती आहे. महिला शिबिर शिष्यवृत्तीचा उद्देश महिलांना शिबिराच्या क्रियाकलापांमध्ये सहभागी होण्याच्या समान संधी निर्माण करणे आणि शिबिरातून मिळू शकणार्‍या अद्वितीय अनुभव, शिकणे आणि वैयक्तिक विकासाच्या संधींचा लाभ घेणे हा आहे.

श्रेणी

प्रभावी अंमलबजावणी आणि कार्यक्रमाचा जास्तीत जास्त प्रभाव सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने, महिला शिबिराचा कार्यक्रम दोन गटांमध्ये विभागला गेला आहे - रणनीती आणि क्षमता निर्माण.

हे दोन गट, रणनीती आणि क्षमता निर्माण, एक केंद्रित आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनास निर्माण करेल. रणनीती गट हा दूरदृष्टी, नियोजन आणि भागधारकांच्या सहभागावर भर देईल; तर क्षमता निर्माण गट हा कौशल्ये, संसाधने आणि टिकाऊपणा वाढवण्यावर भर देईल.

ह्याच पद्धतीचा अवलंब करून शिष्यवृत्तीच्या जागा देखील दोन गटांमध्ये विभागल्या आहेत, जेथे २५ जागा रणनीती गटासाठी राखीव आहेत आणि ३५ जागा क्षमता निर्माण गटासाठी राखीव आहेत.

एकंदरीत, ४५ जागा आंतरराष्ट्रीय आणि १५ जागा प्रादेशिक सहभागींसाठी राखीव आहेत.

शिष्यवृत्ती प्राप्तकर्त्याकडून अपेक्षा

  • ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कॉन्फरन्सपूर्वच्या सत्रांना उपस्थित रहाणे
  • कॅम्पमधील मित्रांसोबत दैनंदिन संवाद करणे
  • सर्वेक्षणात व्यस्त रहाणे (शिबिरानंतर)
  • नियतकालिक धोरणात्मक बैठकांमध्ये भाग घेणे (रणनीती गट)
  • अधिग्रहित कौशल्यांची अंमलबजावणी करणे (क्षमता निर्माण गट)

शिष्यवृत्तीमध्ये काय समाविष्ट आहे

  • कार्यक्रमासंबंधी येण्या-जाण्याचा खर्च
  • कार्यक्रमाच्या दिवसांमध्ये निवास आणि भोजनाचा खर्च
  • व्हिसा शुल्क

प्रमुख तारखा

WikiWomenCamp 2023 शिष्यवृत्ती कार्यक्रमाचा अपेक्षित कार्यकाळ खालीलप्रमाणे आहे:

  • शिष्यवृत्ती फॉर्म प्रकाशन तारीख: १३ जून २०२३
  • शिष्यवृत्ती फॉर्मची शेवटची तारीख: ४ जुलै २०२३
  • निकालांची घोषणा: जुलै २०२३ च्या मध्यात

अर्ज करा

अर्ज करण्यासाठी, कृपया हा फॉर्म भरा.

Applications have closed.