Training modules/dashboard/slides/10903-what-makes-a-good-article/mr

This page is a translated version of the page Training modules/dashboard/slides/10903-what-makes-a-good-article and the translation is 100% complete.

चांगल्या लेखाची लक्षणे

विकिपीडिया हा माहितीचा विश्वसनीय स्रोत नाही अशी वदंता कदाचित आपण आधीच ऐकली असेल. एखादा लेख कदाचित शेकडो लोकांनी मिळून लिहिलेला असेल, त्यातील तथ्ये तपासलेली असतील आणि त्यातील म्हणण्याचे आणि संदर्भांचे परीक्षण करण्यात आले असेल. कदाचित तो एकाच व्यक्तीने एखाद्याच, पूर्वग्रहावर बेतलेल्या संदर्भाच्या आधारे लिहिलेला असेल. किवा कुणी सहज आपल्या व्यवसायाच्या अथवा ग्राहकाच्या प्रचारासाठी त्यात माहिती समाविष्ट केलेली असेल.

अशा वेगवेगळ्या शक्यता असताना विकिपीडियात आढळणारी माहिती ही विश्वसनीय आहे हे आपण कशाच्या आधारे सांगणार?

विकिपीडियावरील सदस्य लेखांच्या गुणवत्तेचे मूल्यमापण कोणकोणत्या निकषांवर करतात ह्याचा आपण आढावा घेऊ.