वापराच्या अटी - सारांश

This page is a translated version of the page Terms of use-Summary and the translation is 100% complete.
वापराच्या अटी
Wikimedia-logo.svg
ही माणसांना वाचता येण्यासारखा वापरच्या अटींचा सारांश आहे. पुर्ण अटी वाचण्यासाठी येथे, टिचकवा.
सुचना: हा दस्तऐवज फ़क्त वापराच्या अटींचा सारांश आहे. वापराच्या अटींना पुर्ण समजून घेण्यासाठीचा हा सोपा संदर्भ आहे. कायद्याच्या भाषेत लिहिलेल्या पुर्ण वापराच्या अटींच्या दस्ताऐवजासाठी ही एक सोपी तोंडओळख आहे.

आमच्या अभियानाचा एक भाग हा ही आहे की:

 • एकत्र आणणे आणि सबलीकरण करणे जगभरातील लोकांनी एकत्र येऊन शैक्षणिक साहित्य तयार करावे आणि ते एकतर मुक्त परवान्या अंतर्गत द्यावे किंवा सार्वजनिकरित्या लोकांना उपलब्ध करून द्यावे.
 • मुक्तपणे जगभराला ह्या साहित्याचे, मोफत वाटप करावे.

तुम्ही ह्या साहित्याबाबत खालील बाबी करण्यास मोकळे आहात:

 • आमचे लेख आणि इतर साहित्य वाचा आणि छापून घ्या.
 • मुक्तस्त्रोत परवाना असलेले आमचे लेख आणि इतर साहित्य इतरांनाही द्या आणि पुन्हा वापरा.
 • आमच्या विविध संकेतस्थळांवर आणि प्रकल्पांवर आपले योगदान द्या व संपादने करा.

फक्त खालील अटींना अधीन राहूनच आपण ते करू शकाल:

 • जबाबदारी — तुम्हीच तुमच्या संपादनांची जबाबदारी घेता (कारण आम्ही फक्त तुम्ही लिहिलेला मजकूर आमच्या संकेतस्थळावर दाखवतो).
 • सभ्यता — तुम्ही सभ्य वातावरणाला पाठींबा देता आणि इतरांचा कोणत्याही प्रकारे छळ करीत नाही.
 • कायद्यांचे पुर्ण पालन — तुम्ही प्रताधिकार कायदे किंवा इतर कोणत्याही कायद्याचा भंग करीत नाही.
 • इजा नाही — आमच्या तांत्रिक व्यवस्थेला कोणतीही इजा तुमच्याकडून होत नाही.
 • वापराच्या अटी आणि धोरणे — आमच्या समुदायाने ठरवून दिलेल्या वापराच्या अटी आणि धोरणांचे तुम्ही काटेकोरपणे पालन कराल.

शिवाय हे ही लक्षात ठेवा:

 • तुम्ही तुमची योगदाने मुक्त परवान्या अंतर्गत देत आहात — तुम्ही नेहमीच तुमची योगदाने आणि कार्य आमच्या संकेतस्थळांवर आणि प्रकल्पांवर फुकट आणि मुक्त परवान्या अंतर्गत देणे आवश्यक आहे. (अपवाद म्हणजे जर तुमचे कार्य/संपादने सार्वजनिक क्षेत्रात आधीच दिली गेली असतील तर).
 • कोणताही व्यावसायीक सल्ला नाही — आमच्या सर्व प्रकल्पातील लेखांमधला सर्व मजकूर शैक्षणिक कारणांसाठी आणि माहितीपर आहे त्यात कोणताही व्यावसायीक सल्ला दिला जात नाही.